कुक्कुटपालन व्यावसायात येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कंपन्यांना येणाऱ्या अडचणींवर उपययोजना करण्यासाठी राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन केली असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला असून, ११ सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुसंवर्धन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत होणाऱ्या या समितीत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, तसंच कुक्कुट व्यवसाय करणारे शेतकरी, आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींचाही समावेश असेल.