शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं, दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरुपात बाजू मांडायला सांगितलं आहे.

दोन्ही बाजूंनी कोणते मु्द्दे मांडले जातील आणि कोणते वकील बाजू मांडतील, याची माहितीही द्यावी, असं देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. १६ आमदारांची अपात्रता यासह इतर याचिका घटनापीठासमोर आहेत. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image