MakeMyTrip, Goibibo आणि OYO कंपन्यांना ३९२ कोटींहून अधिक रुपयांचा दंड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्पर्धा आयोगाने अर्थात सीसीआयने मेकमायट्रिप, Goibibo आणि ओयो यांसारख्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांना अनुचित व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल 392 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीआयने MakeMyTrip आणि Goibibo विरुद्ध त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल आणि OYO सोबत स्पर्धाविरोधी व्यवस्थापन केल्याबद्दल हा निर्णय घेतला आहे. MMT-Go आपल्या हॉटेल भागीदारांवर मनमानी पद्धतीने खोल्यांच्या उपलब्धतेनुसार दर लादत असल्याचं आढळून आल्याचं CCI ने म्हटलं आहे. MMT-Go संबंधित बाजारपेठेतील उत्कृष्ठ स्पर्धक असून ग्राहक MMT-Gos वेबसाइटवर अपलोड केल्या जाणार्‍या माहिती वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. सीसीआय नं आपल्या निवेदनात म्हटले आहे की, MMT-Gos प्लॅटफॉर्मवरील चुकीची माहिती ग्राहकांची दिशाभूल करू शकते.

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image