जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा जागतिक बँकेचा इशारा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. जागतिक बँकेने २०२३ चा जागतिक आर्थिक विकास दर ३ टक्क्यांवरून १ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला.ही घसरण तीव्र जागतिक आर्थिक मंदी येणार असल्याचं सुचित करते असं जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड माल्पस यांनी सांगितलं. ते वॉशिंग्टन इथं जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने वार्ताहरांशी बोलत होते.

महागाई, व्याजदरात झालेली वाढ आणि विकसनशील देशांकडे भांडवलाचा प्रवाह कमी होणे या सर्व समस्यांचा गरिबांना मोठा फटका बसला आहे. या समस्या जागतिक बँकेसमोर मोठे आव्हान असंल्याचंही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की देशातील गरीब लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना आवश्यक ती मदत करण्यावर भर देणं गरजेचं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image