शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह सादर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड, या चिन्हांचा समावेश आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव द्यायला यापूर्वीच निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मिळालेल्या ‘मशाल’ या चिन्हाचं औरंगाबाद इथल्या शिवसैनिकांनी स्वागत केलं आहे. शहरातल्या क्रांतीचौक इथं पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी हातात मशाल घेऊन रॅली काढली आणि मशालीचं पूजन केलं. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.