मणिपूरमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ सुरु

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था):  मणिपूरची राजधानी इम्फाळमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ ला काल सुरुवात झाली. हा मेळावा मणिपूर राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे आयोजित केला जात आहे. २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणाऱ्या या मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग उपस्थित होते. राज्याच्या विविध भागांतील बचत गट, गाव स्तर तसंच गावसमूह स्तरावरील गट त्यांची विविध उत्पादनं मेळाव्यामध्ये प्रदर्शित8 करतात.उद्घाटन समारंभात बोलताना बिरेन म्हणाले की, G20 सदस्य देशांतील अनेक अधिकारी पुढील वर्षी होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी मणिपूरला भेट देतील. राज्य सरकार विविध बचत गटांची उत्पादनं मणिपूर राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकार्य विपणन विकास महासंघ यांच्या सहकार्यानं G20 देशांतील अधिकाऱ्यांसमोर प्रदर्शित करण्यासाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल.