अहमदनगरमध्ये वीजवाहक तारेचा धक्का लागून ४ लहान मुलांचा मृत्यू

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातल्या वांदरकडा इथल्या छोट्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या ४ लहान मुलांचा विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे विराज अजित बर्डे अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावं आहेत.