अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका असल्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं, अशी भारताची मागणी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं, अशी मागणी भारतानं केली आहे. अफ्रिकेच्या सहभागा शिवाय अन्य देशांच्या मदतीनं हा प्रश्न सुटणार नाही, असं भारताच्या संयुक्त राष्ट्र संघातल्या कायम प्रतिनिधी रुचीरा कंभोज यांनी म्हटलं आहे. भारतानं नेहमीच अफ्रिकेला प्राधान्य दिलं आहे. प्रदेशिक मुत्सद्देगिरी, ध्यानधारणा,संवाद आणि संरक्षण क्षेत्रात एकत्रीत प्रयत्नांमुळे या प्रांतात शांतता प्रस्थापित होईल, असंही कंभोज म्हणाल्या. अफ्रिकेला प्रतिनिधित्त्वासाठी नेहमी नकार देणं हा एक ऐतिहासीक अन्याय आहे. ही चूक लवकर सुधारणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्र्रीय समुदायानं देखील अफ्रिकेत शांततेसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रगत देशांनी आणखी आर्थिक मदत आफ्रिकेला द्यावी जेणेकरुन अफ्रिकेच्या नागरिकांचं जीवन सुकर होईल, असंही त्या म्हणाल्या.