भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे की, काही विकसित देशांमध्ये अर्थव्यवस्थेतील मंदी आणि परिणामी मागणीतील मंदीमुळे काही क्षेत्रांतील निर्यातीत घट झाली आहे. बिगर पेट्रोलियम आणि बिगर - रत्ने आणि जवाहिऱ्यांची निर्यात या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरमध्ये १५८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५.५३ टक्क्यांनी वाढली आहे. मंत्रालयानं सांगितलं की, देशानं या वर्षी सप्टेंबरमध्ये ३२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त व्यापारी मालाची निर्यात केली असली तरी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत निर्यातीत ३.५२ टक्क्यांनी घट झाली आहे.

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image