मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं आपला उमेदवार उभा करू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केलं होत. या पार्श्वभुमीवर भाजपानं आज या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.