राज्यातील तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन वेळेत देणे आवश्यक आहे. परंतु काही महाविद्यालय त्यांचे मानधन वेळेत देत नाहीत अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन दिवाळीपूर्वी दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यत त्यांच्या थकित मानधन देण्यात यावे. याबाबत संबंधित उच्च व तंत्रशिक्षण विभागीय सह संचालक यांनी आढावा घेऊन अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी  मिळेल याकडे लक्ष द्यावे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.