सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे.

फिक्की या उद्योजक संघटनेच्या वार्षिक आरोग्य- उपचार विषयक परिषदेचं उद्घाटन करताना आज ते दिल्लीत बोलत होते. आरोग्य सुविधा हा राष्ट्रउभारणीचा आधारस्तंभ असून त्याचं योगदान केवळ आर्थिक मोजपट्टीवरच न मोजता नागरिकांचा आनंद, स्वास्थ्य आणि उत्पादकता या निकषांवरही महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.

आयुष्मान भारत योजनेमुळे गरीबांना महागड्या वैद्यकीय सुविधा मिळू शकतात तसंच १९९० च्या तुलनेत देशातला बालमृत्यूदर एक तृतीयांश पर्यंत घटला आहे याचा उल्लेख त्यांनी केला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image