येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं आश्वासन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या एक वर्षभरात राज्यातल्या ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. नागपुरात २१३ युवकांना नियुक्तीपत्र वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आहे.

खासगी क्षेत्रातल्या व्यावसायिकांना ज्या पद्धतीचे कौशल्य हवे आहे त्या पद्धतीच्या कौशल्य निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या मोठ्या संख्येने मिळाव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघ निहाय रोजगार मेळावे आयोजित करणार असल्याचं फडनवीस यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.