दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसित करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसीत करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं इंटरपोलच्या ९० व्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना  बोलत होते. त्यासाठी भारत संवर्धित जागतिक सहकार्याचं आवाहन करत आहे. असं ते म्हणाले.

आपत्तीच्या काळात भारत इतरांच्या  मदतीसाठी सर्वात पुढं असतो. संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत भारतानं महत्तवाची भूमिका बजावली आहे, असं त्यांनी सांगितलं. भारतानं जोपासलेली नीतीमूल्यं इंटरपोलच्या संकल्पनेत आढळतात. जगभरातले पोलीस समाजाच्या कल्याणाची धुरा पुढं नेत आहेत, असं ते म्हणाले. कोरोना काळात पोलीसांनी बजावलेल्या भूमिकेची मोदी यांनी यावेळी प्रशंसा केली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image