भारत रुपे पेमेंट पध्दतीचा अवलंब करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध देशांशी चर्चा
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत रुपे पेमेंट पध्दतीचा अवलंब करण्यासाठी विविध देशांशी चर्चा करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वॉशिंग्टन इथं सांगितलं. त्या एका प्रमुख थिंक टँकने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. सीतारामन पुढे म्हणाल्या की सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातींनी रुपे पध्दतीमध्ये रुची दाखविली असून युपीआय, भीम ऍप आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे सर्व आता इतर देशांतील प्रणालींशी बरोबरी गाठण्यासाठी विकसित केले जात आहेत.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीसाठी अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.