राज्यात २०२३ मधे तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीची पुस्तकं मराठीत उपलब्ध होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंगप्रमाणेच वैद्यकीय तसंच वकिलीच्या पदवीचे शिक्षणही मराठीतून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल नाशिक मध्ये दिली. महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये दिमाखदार सोहळ्यात इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च २०२२ उपक्रमांतर्गत औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या गुणवंत इंजिनिअर्सचा पाटील यांच्या हस्ते विविध पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

नवीन शैक्षणिक धोरणात विविध विद्याशाखांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच देण्याची तरतूद असून राज्यात ३१ डिसेंबर २०२२ नंतर नवीन वर्षात तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीची सर्व पाठ्यपुस्तकं मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image