सीमावर्ती भागातील पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा भारत आणि चीनने घेतला आढावा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनने त्यांच्या सीमावर्ती भागातील पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा काल आढावा घेतला. भारत-चीन सीमा प्रकरणी चर्चा आणि समन्वयासाठी कार्यरत यंत्रणेच्या २५ व्या बैठकीदरम्यान, द्विपक्षीय संबंध सुदृढ रहावे यासह वास्तविक नियंत्रण रेषेवर शांतीपूर्ण परिस्थिती निर्माण करणं तसेच उर्वरित समस्यांच्या निराकरणसाठी दोन्ही देशांनी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांद्वारे चर्चा सुरू ठेवण्याचं मान्य केलं आहे. या वर्षीच्या मे महिन्यात झालेल्या बैठकीनंतर गेल्या महिन्यात टप्प्याटप्प्याने, समन्वित आणि सत्यापित पद्धतीनं केलेल्या गोगरा-हॉट स्प्रिंग्स (PP-15) क्षेत्रातील बंदीचं  त्यांनी स्वागत केलं. विद्यमान द्विपक्षीय करार आणि शिष्ठाचाराच्या अनुषंगाने पश्चिम क्षेत्रातील एल ए सीसह उर्वरित समस्यांच्या निराकरणासाठी, त्यांनी वरिष्ठ कमांडर्सच्या बैठकीची पुढील फेरी लवकरात लवकर घेण्याचं मान्य केलं आहे.