जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीद्वारे विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनवर मात

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीनं पाच वेळा विश्वविजेता बनलेल्या मॅग्नस कार्लसनवर काल मात केली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत झालेल्या या सामन्यात अर्जुननं सातव्या फेरीत कार्लसनवर मात केली. नॉर्वेच्या कार्लसनचा एरिगायसीनं केलेला हा पहिलाच पराभव आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात झालेल्या ज्युलिअस बेअर जनरेशन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत एलिगायसी कार्लसनकडून पराभूत झाला होता. एरिगायसीचा एमचेस स्पर्धेत भारताच्या विदित गुजराथीकडून पराभव झाला असला, तरी कालच्या विजयामुळे तो पाचव्या स्थानावर आला आहे. भारताचा डी गुकेश बारा गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे. गुजराथी दहाव्या, आदित्य मित्तल अकराव्या, तर हरीकृष्णा पंधराव्या स्थानावर आहे.