प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला दिली स्थगिती

 


मुंबई (वृत्तसंस्था) : प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. काल दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं निर्दोष मुक्तता केली होती. नक्षलवादी चळवळीत सहभाग आणि सहकार्य देत असल्याच्या आरोपावरुन त्यांना २०१४ मध्ये अटक झाली आली होती. याप्रकरणी २०१७ मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावरची सुनावणी २९ सप्टेंबरला पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. आज न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठानं साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निर्दोष ठरवत तत्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले.