गोपाल रत्न पुरस्कार - २०२२ साठी अर्ज मागणीकरिता आवाहन

 

मुंबई : सन-२०१७ नंतर प्रथमच केंद्र शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने https://awards.gov.in ह्या लिंकवर राष्ट्रीय स्तरावरील “गोपाल रत्न पुरस्कार-2022” करीता अर्ज मागविण्यात येत असून पात्र पशुपालक ,कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, सहकारी संस्था,दूध उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संस्थांनी अर्ज करावे असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

गोपाल रत्न पुरस्कार -२०२२ साठी पुरस्कारामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारामधून तीन याप्रमाणे एकूण नऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

प्रथम प्रकार गायींच्या 50 जाती आणि म्हशींच्या 17 जातींपैकी कोणत्याही मान्यताप्राप्त देशी जातीची देखभाल करणारे शेतकरी , पशुपालक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. दुसरा प्रकार राज्य ,
केंद्रशासित प्रदेश पशुधन विकास मंडळ,राज्य,दूध महासंघ,एनजीओ आणि इतर खाजगी संस्थांचे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AI Technicians)‍ ज्यांनी किमान 90 दिवसांचे कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण घेतले आहे ते पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

तिसरा प्रकार सहकारी संस्था,दूध उत्पादक कंपनी (MPC),शेतकरी उत्पादक संस्था (FPO) गावपातळीवर स्थापन केलेल्या दुग्ध व्यवसायात गुंतलेली आणि सहकारी कायदा, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत आहे, आणि दररोज किमान 100 लिटर दूध संकलन करते आणि किमान 50 शेतकरी आहेत सदस्य,दूध उत्पादक सदस्य दुग्ध व्यावासाशी संबंधित आहे.

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारामध्ये गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि प्रत्येक श्रेणीमध्ये खालीलप्रमाणे रक्कम असते:
रु. 5,00,000/- (रु. पाच लाख फक्त) -पहिला क्रमांक
रु. 3,00,000/- (रु. तीन लाख फक्त) -दुसरा क्रमांक
रु. 2,00,000/- (रुपये दोन लाख फक्त) -तृतीय क्रमांक

वरीलप्रमाणे शेतकरी ,पशुपालक , कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (AI Technicians) , सहकारी संस्था,दूध उत्पादक कंपनी (MPC),शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांनी दिनांक 10.10.2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने https://awards.gov.in ह्या लिंकवर राष्ट्रीय स्तरावरील “गोपाल रत्न पुरस्कार-2022” करीता अर्ज करण्याचे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.