अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

 


मुंबई : अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टप्पा – 2 योजनेमध्ये नवीन 15 एम.एल.डी. क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. अंबरनाथ शहराची पाण्याची गरज लक्षात घेता हे नवीन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करुन पाणीपुरवठा योजना जलदगतीने सुरु करावीअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले. तसेच सद्यस्थितीत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अंबरनाथ येथील पाणीपुरवठा योजनेबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकरपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वालमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णायांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणालेअंबरनाथ शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन शहरासाठी पुरेशा पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचाही यासंदर्भात वारंवार पाठपुरावा आणि मागणी आहे.  त्यामुळे या शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टप्पा – दोन योजनेंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अत्यावश्यक आहे. याबाबतची सद्यस्थिती आणि मनुष्यबळासह इतर बाबींसंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सध्याची पाणीपुरवठा व्यवस्थाया योजनेतील एकूण नळजोडण्यांची संख्याअधिकृत नळजोडणीअनधिकृत नळजोडण्या असतील तर त्या कमी करणे या बाबींकडे लक्ष देवून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तत्काळ कार्यवाहीच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.