दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला १५ दिवसात मान्यता देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडलेल्या दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली.  ते ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.

काल नागपूरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो. या वर्षी कमलाताई रा. गवई कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या तर  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.