शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्हाबाबत म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदतमुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत 'धनुष्यबाण' हे चिन्ह वापरण्याची परवानगी द्यावी असा अर्ज शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे मंगळवारी केला होता. त्यावर म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला ही मुदत दिली आहे. यावेळी आवश्यक कागदपत्रं जोडण्याचे आदेशही निवडणूक आयोगानं दिले आहेत.