अखंडित विज पुरवठ्यासाठी पुढील २५ वर्षांचे नियोजन करा : आमदारअण्णा बनसोडे

 

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील विज समस्या सोडविण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी नुकतीच नव्याने स्थापन झालेल्या विज वितरण समितीची बैठक घेऊन पिंपरी मतदारसंघातील अडचणींचा व विकासकामाचा आढावा घेतला. यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.दत्तात्रय साळी(पिंपरीविभाग) कार्यकारी अभियंता श्री. भोसले(भोसरी विभाग), सदस्य सचिव तथा उपअभियंता श्री. गणेशचाकूरकर, सदस्य अजय चव्हाण, नितीन वाघमारे,दिपक साळवे यांच्यासह महावितरण पिंपरी व भोसरी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महावितरण अधिकाऱ्यांनी शहरातील विजसमस्या व वितरण प्रणालीतील अडचणी बैठकीत मांडल्या महापालिकेमार्फत होणारी सततच्या रस्ते खोदाईमुळे विद्युत केबल डॅमेजझाल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होते. दरम्यान महावितरणला डॅमेज केबलचे ठिकाण शोधण्यात बराच वेळ जातो. परिणामी महावितरण अधिकाऱ्यांना नाहक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची खंत अधिकारी वर्गाने बोलून दाखविली.

पुढील आठवड्यात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन रस्ते खोदाईमुळेविद्युत वाहिनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन व्हावे यासाठी महावितरण अधिकाऱ्यांसमवेतमनपा आयुक्तांशीसंयुक्त चर्चा करून तोडगा काढू असे बनसोडे म्हणाले.

पिंपरी भागात अनेक ठिकाणी डीपी बॉक्स उघडे तसेच जमिनीत गाडले गेलेले असुनयाची दुरुस्ती तातडीने करावी असे समिती सदस्य नितीन वाघमारे यांनी म्हटले, यावर आढावा घेऊ तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता साळी यांनी सांगितले. अजय चव्हाण यांनी संत तुकारामनगर, वल्लभनगर तसेच दिपक साळवे यांनी दापोडी भागातील समस्या मांडल्या.

पिंपरी विधानसभा मतदार संघात २०१९-२०  साली ३७ लाख २०२०-२१ मध्ये ३ कोटी रुपयांची कामे करण्यात आली तर पिंपरी कॅम्प परिसरामध्ये Sub Station व स्मार्ट मिटर बसविणे यासाठी १२७ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचीमाहिती आमदार बनसोडे यांनी दिली. पुढील काळातील वाढती विज मागणी लक्षात घेता या उपकेंद्रामुळे पिंपरी व परिसरातील विज पुरवठा सुरळीत व उच्चदाबाने होण्यासाठी फायद्याचे ठरणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बैठकीच्या वेळी समितिची पहिलीच बैठक असल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी सर्व नवनविन सदस्यांचे सत्कार व स्वागत केले. पिंपरी विधानसभेसाठी विजवितरण समितीची स्थापना २६/०६/२०२२ रोजी तत्कालीन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केली होती.एकूणच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विज प्रश्न सोडविण्यासाठी समिती सदस्यांनी काम करावे व नागरिकांच्या समस्या अधिकारी वर्गा पर्यंतपोहचवून सोडविण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत तसेच पदाचा वापरकरून गैरकृत्य करू नये अशी तंबी आमदार बनसोडे यांनी समितीच्या सदस्यांना दिली व अधिकारी वर्गाने समिती सदस्यांना सन्मानाची वागणूक द्यावी व त्यांचा सहकार्याने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी सूचना शेवटी केली.