MPSC कडून पुढच्या वर्षी होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढच्या वर्षात आयोजित होणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये आणि मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये होईल. नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा जूनमध्ये तर मुख्य परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.