शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्याआधी गोरेगावमध्ये आज शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्य़वस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात आणि पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.