मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस मिळणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केलं. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या ९३ हजार आणि बेस्टच्या २९ हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

'कोविडच्या बिकट परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे. विकास कामांवर खर्च केलाच पाहिजे, पण चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहनही दिलं पाहिजे' असं मुख्यमंत्री म्हणाले. 'आनंदात दिवाळी साजरी करा. पण सगळ्यांनी मुंबईकरांसाठी मनापासून काम करा,' असं आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केलं.