शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार- उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर आणि भाषणावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या शिंदे गटाने देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला आहे.