वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानं युवकांच्या हातून रोजगार निसटला अशी आदित्य ठाकरे यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातून एकेक प्रकल्प चालले असून वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानं युवकांच्या हातून रोजगार निसटला, अशी टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याजवळ वडगाव इथं जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड काळात महाविकास आघाडी सरकारनं गुंतवणूक आणली. युवकांच्या पाठीशी शिवसेना आहे, असं त्यांनी सांगितलं. वेदांत प्रकल्पासाठी तळेगावची जागा उत्तम होती. पूर्ण सवलती देऊनही प्रकल्प, घटनाबाह्य सरकारमुळे राज्याबाहेर गेला, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. या सरकारनं युवकांची स्वप्नं धुळीला मिळवली. या राज्यातल्या युवकांना रोजगार कधी मिळणार असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image