प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या ९ लाख विद्यार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या कौशल्य दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं आज इतिहास रचला गेला आहे, असं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विश्वकर्मा दिनाचं औचित्य साधून, आयोजित केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कौशल दीक्षांत समारंभात ते आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

शालेय स्तरावर कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी देशात 5 हजार कौशल्य केंद्रं स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.  गेल्या आठ वर्षात आय टी आय मध्ये चार लाख नव्या जागा उपलब्ध झाल्या आहेत, आयटीआयमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या सैन्यात भरतीसाठी विशेष तरतूद आहे, असं ते म्हणाले.