भारताच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांचं विविध देशांकडून कौतुक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या न्यूयॉर्कमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्रात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांबद्दल विविध देशांकडून कौतुकाचा सूर उमटताना दिसत आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की,रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गी लाव्हरोव्ह तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन अश्या अनेक देशांच्या नेत्यांचा यात समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अॅन्तोनिओ गुटेरस यांनीही जगाच्या शाश्वत विकासासाठी भारत आणि भारताचे प्रधानमंत्री यांच्या सहभागाचा आवर्जून उल्लेख केला आहे. कोविड काळात मोदी यांनी मदत केल्याचा अनेक देशांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. युक्रेन आणि रशिया ह्या सध्या एकमेकांसमोर उभ्या  ठाकलेल्या दोन्ही देशांनी भारतानं या काळात रशिया - युक्रेन संघर्षाला विरोध करतांनाच घेतलेल्या संयत भूमिकेची प्रशंसा केली आहे.भारताच्या पावलावर पाउल टाकून अविकसित देशांना विकासाची, विकसनशील देशांना विकासकामं सुरु ठेवण्याची आणि विकसित देशांना विकासात सातत्य ठेवण्याची प्रेरणा मिळत असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image