कोविड महामारीच्या काळात प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली - अनुराग ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या काळात, प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, अचूक वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे लाखोंचे प्राण वाचण्यास मदत झाली असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं. त्यांच्या  हस्ते आज आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्था अर्थात, एआयबीडीच्या २० व्या बैठकीचं आणि ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

प्रसारमाध्यमांनी या परीक्षेच्या काळात, संपूर्ण जगाला एका व्यासपीठावर एकत्र आणून ‘वसुधैव कुटुंबकम्’ चं तत्व आचरणात आणल्याची भावना ठाकूर यांनी व्यक्त केली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक अग्रवाल यांना या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.