फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता १०वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयता पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा आज जाहीर केल्या. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे.

सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र परीक्षेपूर्वी शाळा महाविद्यालयांना छापील स्वरुपात दिलं जाणारं वेळापत्रक अंतिम असेल असं मंडळानं स्पष्ट केलं आहे.