भारतीय वंशाच्या बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन ब्रिटनच्या नव्या गृहमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन यांची ब्रिटनच्या नवीन गृहमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रधानमंत्री लीझ ट्रस यांनी त्यांची नियुक्ती केली. सुएला यांच्या आधी या पदावर भारतीय वंशाच्या प्रीती पटेल या होत्या.

ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून सेवा देण्यासाठी प्रधानमंत्री लीझ ट्रस यांनी आपल्याला नियुक्त करून आपला सन्मान  केल्याचं  सुएला यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. सत्तारूढ हुजूर पक्षाच्या सुएला ब्रेव्हरमन यांनी यापूर्वीच्या बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये ऍटर्नी जनरल म्हणून काम केलं होतं.