केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. येत्या ३ महिन्यात राणे यांनी स्वतःहून बांधकाम तोडावं. अन्यथा मुंबई महापालिकेला हे बांधकाम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.