प्रधानमंत्री व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय आर्थिक मंचाच्या सत्रात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी रशियातल्या व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय  आर्थिक मंचाच्या आजच्या सत्रात दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. या मंचाच्या बैठकीत २०१९ साली ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. पूर्वीय आर्थिक मंचाची सातवीं बैठक सोमवारपासून सुरु आहे.  साठहून अधिक देशांचे प्रतिनिधि यात सहभागी झाले असून 'बहुध्रुवीय विश्वपथाकडे’ ही यंदाची संकल्पना आहे.