शिवसेनेच्या दोन्हीही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारल्याचं पालिकेकडून जारी केलेल्या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होत आहे.