मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे शिर्डी साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. आठ आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश न्यायालयानं शासनाला दिले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांची त्रिसदस्य समिती संस्थांनाचं कामकाज पाहणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. आघाडी सरकारच्या काळात साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणूक झाल्या होत्या. या संदर्भात शिर्डी इथले सामाजिक कार्यकर्ते उत्तम रभाजी शेळके यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नियुक्त केलेलं विश्वस्त मंडळ हे संस्थानाच्या घटनेनुसार नसल्याचा दावा त्यांनी या याचिकेत केला होता.  

Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image