ऍटर्नी अरुण सुब्रमण्यन यांची दक्षिण न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्ती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले ऍटर्नी अरुण सुब्रमण्यन यांना अमेरिकेच्या बायडेन सरकारनं दक्षिण न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्त केलं आहे. याबद्दलची शिफारस राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने सिनेटला पाठवली असून त्याला लवकरच सिनेटची मंजुरी मिळेल.

त्यानंतर अरुण सुब्रमण्यन हे दक्षिण आशियाई वंशाचे अमेरिकेतले पहिले जिल्हा न्यायाधीश होतील. अरुण सुब्रमण्यन सध्या न्यूयॉर्कच्या गॉडफ्रे एल एल पी मध्ये भागीदार आहेत. नॅशनल एशियन पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशन ने त्यांचं या नियुक्तिबद्दल  अभिनंदन केलं आहे.