अशोक गेहलोत यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी आज ही घोषणा केली. राज्यस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहणार का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की हा निर्णय सोनिया गांधी घेतील.