परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्र्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रियाधमध्ये सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहाद अल सौद यांच्याशी काल द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा केली आणि जी-ट्वेंटी आणि इतर संघटनांमध्ये परस्परसहकार्यानं काम करण्याबाबत सहमती व्यक्त केली. जयशंकर यांनी सौदी अरेबियाचे प्रमुख प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांचीही काल भेट घेऊन उभय देशांमधल्या चर्चेच्या प्रगतीबाबत माहिती दिली.