मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत, हिवाळी अधिवेशनापर्यंत उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाही. पालकमंत्री नेमलेले नाहीत. राज्यावर अतिवृष्टी आणि आता ढगफुटीचे संकट आलं. धरणाचं पाणी सोडल्यामुळे त्याखालच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष द्यायला कुणी नाही, असे सांगत, मुख्य़मंत्री सभा आणि देवदर्शनात मग्न असल्याबद्द्ल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे असंही ते म्हणाले.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image