सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या मोहाडी इथल्या शेतकऱ्यांची मालकी असलेल्या सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कंपनीत अशा प्रकारची ही देशातील पहिलीच गुंतवणूक असल्याचा दावा सह्याद्री फार्मच्या वतीनं करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी सह्याद्रीने छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहभागी करून २०१० मध्ये दहा शेतकऱ्यांना एकत्र करून ही कंपनी सुरू केली होती. प्रत्येक लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना या कंपनीच्या माध्यमातून प्रेरणा मिळत आहे, अशी प्रतिक्रिया, सह्याद्रीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image