अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला’ चांगला प्रतिसाद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्यं परिवहन महामंडळाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला’ चांगला प्रतिसाद मिळत असून, आजपर्यंत ५४ लाखांहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेदवारे ७५ आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांना एस टी तून मोफत प्रवासाची मुभा आहे  तर, ६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना एस टी बसभाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या औचितत्याने ही योजना सुरू करण्यात आली आहे.