नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय

 


मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. आपत्तीग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सततच्या पावसानं ६५ मिलीमीटर पावसाच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातल्या ६ लाख शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सुमारे साडे ५ लाख हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना 3 हजार 600 कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत.