काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव

 

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसनं एकमतानं मंजूर केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या या ठरावाला चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी अनुमोदन दिलं.

प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार पक्षाध्यक्षांना बहाल करण्याचा प्रस्तावही एकमतानं मंजूर झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिलं.