ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि इंग्लंड सरकारनं ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित केला होता. ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांना तोंड देऊन त्यांचा बिमोड करण्यासाठी या सरावाचा उपयोग होणार आहे.

ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांवरचे खंडणी मागणारे आणि सॉफ्टवेअर यंत्रणा नष्ट करणारे हल्ले थांबवण्यासाठी या सरावात सामील झालेल्या  कंपन्यांना प्रशिक्षण मिळत आहे.