रेल्वेच्या जमिनी भाडेपट्ट्यानं देण्याच्या धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पंतप्रधान गति शक्ती’ अंतर्गत रेल्वेच्या जमिनी दीर्घकालीन भाडेपट्ट्यानं देण्याच्या धोरणालाही काल मान्यता दिली. या धोरणामुळे रेल्वेला अधिक महसूल मिळेल आणि एक लाख 20 हजार नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. पुढील 5 वर्षांत 300 ‘पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल’ही विकसित केले  जाणार आहेत. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान शिक्षण क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास देखील केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.

केंद्रीय मंत्री मंडळानं काल उदयोन्मुख भारत अंतर्गत, ‘पीएम - श्री स्कूल स्थापन करण्याच्या नव्या केंद्र पुरस्कृत योजनेला मंजुरी दिली. या योजनेमुळे केंद्रीय विद्यालयं आणि नवोदय विद्यालयांसह देशातल्या 14 हजारांहून अधिक शाळांना  ‘पीएम - श्री शाळा’ म्हणून विकसित केलं जाणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या, सध्या सुरू असलेल्या शाळांना याचा लाभ होईल.