कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता सीट बेल्ट घालणं अनिवार्य केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नवी दिल्ली एका समारंभात ते बोलत होते. या संबंधातील आदेश येत्या तीन दिवसांत सरकार जारी करेल असं ते म्हणाले.

कारमध्ये पुढे किंवा पाठीमागे बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट न लावलेला आढळल्यास त्यांना दंड ठोठावला जाईल असं ते म्हणाले. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे.