अहमदाबाद इथं १० तारखेला होणाऱ्या २ दिवसीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमधील अहमदाबाद इथं येत्या १० तारखेला होणाऱ्या दोन दिवसीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक, विविध मत्रालय, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि १०० हून स्टार्टअप्सचे सीईओ या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

नवीन तंत्रज्ञानावर भर देत जगण्यातील सुलभता वाढवण्यासाठी त्याचा सुयोग्य वापर यावर परिषदेत भर देण्यात येणार असून, या परिषदेमुळे देशभरात समन्वयाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची परिसंस्था मजबूत होऊ शकेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह म्हटलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image